Description
बिरसा म्हणाला, जर माझे बरे वाईट काही झाले तर ते नक्की मला अग्नी देतील. तेव्हा तू जाळलेल्या ठिकाणी जा आणि तेथील माझ्या देहाची राख गावा गावात आणि पहाडी दर्याखोऱ्यात जिथे कुठे आदिवासी माणसाची पावले उमटतील तेथे टी राख तू टाकून ये. मग पुढे बघ काय होते ते त्या सर्व ठिकाणाहून, लोकांच्या उघड्या वाघडया वस्त्यांतून बिरसा पुन्हा उगवेल कारण ”उलगुलानला अंत नाही आणि बिरसाला मरण नाही ” शालीचे ते रोमांचकारी उदगार ऐकून शिवन आणि धरमूंनी बिरसाच्या जळालेल्या राखेच्या अधिक जवळ गेले. थोडी राख घेऊन टी दोघांनीही ती आपल्या कपाळाला लावली. तसे ते थेट बिरसाईत नसले तरी बिरसाच्या चळवळीला खूप मानत होते. त्यांनी शालीची री ओढत म्हटले …. ”उलगुलानला अंत नाही …. बिरसाला मरण नाही ”
Reviews
There are no reviews yet.