केशवराव जेधे चरित्र

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव केशवराव जेधे चरित्र
लेखक य. दि. फडके
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २२२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३०५ ग्रॅम
Category:

Description

महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार आणि छत्रपती शाहू महाराज यांचा बहुजनांच्या उद्धाराचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आणि १९१९ ते १९०९ हा चाळीस वर्षांचा कालखंड आपल्या कार्यकर्तृत्वाने अक्षरशः गाजवणारे बहुजनांचे नेते देशभक्त केशवराव जेधे यांचे अत्यंत निःस्पृहपणे लिहिलेले हे जीवनचरित्र, या पुस्तकान केशवराव जेधे वा लोकनेत्याची राजकीय-सामाजिक जडणघडण, ब्राह्मणेतर चळवळीतील त्यांचे नेतृत्व, पुरोगामी विचारांची त्यांनी धरलेली कास आणि त्यासाठी केलेला अविरत संघर्ष यांचे तर दर्शन घडतेच, शिवाय महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आणि शिवस्मारकासाठी केशवरावांनी सभागृहात उभे केलेले तंटेबखेडे सामाजिक जीवनात उभी केलेली चळवळ आणि प्रस्थापित सनातनी नेतृत्वाला आव्हान देत बहुजनांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी दिलेला लढाही वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. शेतकरी-कष्टकरी वर्गासाठी केशवरावांनी केलेल्या संघटनकार्याचे आणि खेडोपाड्यात काँग्रेस पक्ष रुजवताना त्यांना घ्याव्या लागलेल्या कठोर मेहनतीचे चित्रही आपल्या समोर उभे राहते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचे अस्पृश्यता निवारण कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, महात्मा गांधीचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम अशा आत्यंतिक महत्त्वाच्या घटनांतील केशवरावांची मौलिक भूमिकाही स्पष्ट होते; तर ब्राह्मणेतर पक्ष ते कॉंग्रेस आणि काँग्रेस ने शेकाप मग पुन्हा काँग्रेस या केशवरावांच्या राजकीय प्रवासात आपणही सहभागी होतो. हे पुस्तक म्हणजे एका देशभक्ताच्या जीवनकार्यांचा तटस्थपणे घेतलेला वेध आहे.

य. दि. फडके (३ जानेवारी, १९३१ ते ११ जानेवारी, २००८) हे मराठी साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे चरित्रकार आणि अभ्यासक होते. साक्षेपी लेखक, संपादक आणि संशोधक म्हणून मे सर्वपरिचित होते. ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९४७)’ हा त्यांनी लिहिलेला महाराष्ट्राचा राजकीय इतिहास अभ्यासकांना, संशोधकांना दिशादर्शक ठरणारा आहे. फडकेंचे लेखन अस्सल दस्तऐवजावर आधारलेले, ठाम, ठाशीव आणि नेमके आहे. त्यांनी अनेक राजकीय चरित्रे लिहिली असून, २००० साली बेळगाव येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

‘आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक य. दि. फडके लिखित केशवराव जेधे चरित्र ऐतिहासिक ऐवज म्हणून साहित्यरसिक कायम आपल्या संग्रही ठेवतील, असा मला विश्वास आहे. ‘
शरद पवार 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “केशवराव जेधे चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *