गौतम बुद्धांचे चरित्र

₹200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गौतम बुद्धांचे चरित्र
लेखक कृष्णराव अर्जून केळूसकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २२२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३८० ग्रॅम

Description

एकोणिसाव्या  शतकाच्या शेवटी गौतम बुद्धाच्या अभ्यासाला सुरूवात झाली. नेमक्या त्याच काळात कृष्णराव केळूसकारांनी यांनी गौतम बुद्धा चरित्र लिहिले. त्या काळात पूर्व भारतातील आणि पश्चिम भारतातील उच्च वर्गीय लोक बुद्ध परंपरेकडे वळले होते. तेव्हा सत्यशोधक चळवळ कृतीशील होती. तसेच त्यानंतर ब्राह्मणेत्तर चळवळ कृतीशील झाली. गुरुवर्य केळूसकर सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेत्तर चळवळ, बुद्ध चळवळीला जोडणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे दुवा होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बौद्ध विचारांचे मर्म ओळखले होते. त्यांनी बौद्ध धर्माला त्यांच्या वाड्यात मदतीचा हात पुढे केला होता. महाराजा सयाजीराव गायकवाडाप्रमाणे ब्राह्मणेत्तर चळवळीत बुद्ध विचारांचा गंभीरपणे विचार करणारे गुरुवर्य केळूसकर हे महत्त्वाचे विचारवंत होते. गुरूवर्य केळूसकारांनी अगदी सुरुवातीला बुद्ध चरित्रांच्या साधनांचे संकलन केले. गौतम बुद्ध चरित्र यामध्ये क्रमांक चार ते नऊ मध्ये संस्थाची पुनर्रचना व मूल्यांची पुन मांडणी केळूसकरांनी केली आहे. (मोक्षमार्गप्राप्ती, धर्मोपदेश, बुद्ध धर्म संस्थापना, धर्मबोध पद्धती, आयुष्यक्रम आणि बुद्ध धर्माचे संक्षिप्त निरूपण). ‘पूर्ववय’ व ‘संसारत्याग’ ही आरंभीची दोन प्रकरणे नवनिर्मितीची दिशासूचक आहेत. तर शेवटचे प्रकरण विस्तार व ज्ञानाच्या शुद्धीकरणाचा आशय मांडते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गौतम बुद्धांचे चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *