Description
अणुबॉम्बची चाचणी करताना प्रत्यक्ष विस्फोट झाल्यावर ‘मी आज आख्ख्या जगाला संपवणारा मृत्यु स्वत:च बनलो आहे.’ असं म्हणणारा आणि ज्याला सगळं जग अणुबॉम्बचा जनक म्हणतं तो आहे जे. रॉबर्ट ओपेनहायमर ! असामान्य बुद्धी आणि प्रतिभा असलेला अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, व्यासंगी विचारवंत, लॉस अल्मास इथल्या मैनहटन अनुसंशोधन प्रकल्पाचा संचालक, अणुबॉम्ब निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असलेला वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यानंतरच्या काळात हायड्रोजन बॉम्बला विरोध करणारा अशा अनेक रूपांत जे. रॉबर्ट ओपेनहायमर आपल्याला भेटतो.
‘या अण्वस्त्रानं राष्ट्रराष्ट्रांमधले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसांमधल्या नातेसंबंधांवरही होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये.’ असं म्हणणारा ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. एक बुद्धिमान, कल्पक, यशस्वी अशा ओपेनहायमरसारख्या वैज्ञानिकाला वैज्ञानिक जगतानं आणि सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं. पण सरकारनं मात्र कायम संशयाच्या तराजूत त्याला तोललं आणि मेल्यानंतरही वेळोवेळी त्याला अपमानित केलं. ओपेनहायमरला आयुष्याच्या अखेरच्या काळात क्लेशकारक परिस्थितीला सामोरं जावं लागलं. प्रत्यक्ष अणुबॉम्ब निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असल्यानं ओपेनहायमरला अणुबॉम्बचा जनक म्हणून एकीकडे गौरवलं गेलं, तर दुसरीकडे मरणानंतरही अवहेलनाच त्याच्या वाट्याला आली !
Reviews
There are no reviews yet.