Description
आता कित्येक वेद धर्माभिमानी पुरूषांचे ऐसे म्हणणे पडेल की, ज्याने सनातन वेदधर्मांशी विरोध करून आत्मा व परमात्मा या विषयीच्या कल्पना विवेकशुद्ध नाहीत असे प्रतिपादन केले. या नास्तिकशिरोमणीचे चरित्र व धर्ममते यांविषयी जीज्ञासा उत्पन्न होण्यात काय अर्थ आहे? या शंकेचे समाधान अर्थात असे आहे, की त्याचे बहुतेक तत्वविचार, नीतिविचार तत्कालीन आर्यविचार पद्धतीत अनुसरून होते. एवढेच नव्हे, तर तो स्वत: असे म्हणे की, आपण काढलेला मोक्षसिद्धीचा मार्ग पुरातन असून चालू असलेला धर्ममार्ग भ्रममूलक आहे. यावरून पाहता त्याच्या मताचे ज्ञान प्राप्त झाल्याचे अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांच्या मनात कोणते धर्मविचार व तत्त्वविचार घोळत होते त्याची माहिती आम्हास अंशत: होईल. दूसरे असे की, बुद्धकृत धर्मपरिवर्तन या भारतभूमीत सुमारे एक सहस्त्र वर्षे कायम राहून, पुढे ते हळूहळू निर्मूळ होऊन शेवटी केवळ नामशेष झाले आणि सांप्रत तर त्या धर्माचे अनुयायी नेपाळ व काश्मीर खेरीजकरून हिंदुस्थानच्या इतर भागात फार तर दोन-अडीच लाख असतील. तेव्हा जो धर्म अशोकासारखा दिग्विजयी चक्रवर्ती राजाचा हस्तालंब मिळून हिंदुस्थानात एके काळी सर्वत्र पसरला होता, त्याचे बहुतेक निर्मूलन युद्धादिमूलक रक्तपातादी घोर प्रसंग घडून न येता व्हावे हे मोठेच विलक्षण आहे. यास्तव बुद्धधर्माच्या प्रसाराचा व पराभवाचा वृत्तांत देवधर्माभिमानी जणांनी अवश्य जाणून अवश्य जाणून घ्यावा असा आहे.
जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल आणि जीवन आनंदात जगायचे असेल तर गौतम बुद्धाचे चरित्र वाचलेच पाहीजे. गौतम बुद्धांनी जगाला शांततेच्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. गौतम बुद्धाच्या अमूल्य विचारांनी मनाला शांती मिळते आणि चिंताm द्वेष, मत्सर यापासून मुक्ती मिळते. यासारखे अनेक अमुल्य विचार तुम्हाला गौतम बुद्धाच्या चरित्रातून नक्की वाचायला आणि अनुभवायला मिळेल.
Reviews
There are no reviews yet.