फ्रेडरिख नित्शे : जीवन आणि तत्त्वज्ञान

405.00

1 in stock

पुस्तकाचे नाव फ्रेडरिख नित्शे : जीवन आणि तत्त्वज्ञान
लेखक विश्वास पाटील
ISBN 978-93-84416-00-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २७२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम
Category:

Description

विसाव्या शतकाच्या बौद्धिक वातावरणावर नित्शेइतका प्रभाव अन्य तत्त्ववेत्त्यांचा नाही.  नित्शेचे हे ऋण जगभरातील सर्वच लेखकांनी मान्य केले आहे.  नित्शेच्या विचारांचा प्रभाव अनेक साहित्यिक, कलावंत, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते यांच्यावर पड़ला.  पुढे यांनी आपल्या विचारांनी जग बदलून टाकले.  या प्रतिभावंत विचारवंतांत वैग्नर, शौपेनहोर, डार्विन, ग्रीक, आल्बेर काम्यू, सार्त्र यांप्रमाणेच अनेक महान व्यक्तींचा उल्लेख करता येईल.

नित्शे ‘ परमेश्वराचा अंत झाला ‘ म्हणतो, या गोष्टीशी जोडल्या गेलेल्या अनेक सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची चर्चा या पुस्तकात आहे. देव आणि धर्म यासंबंधीचे त्यास तत्त्वज्ञान आणि यानिमित्ताने त्याची भूमिका समजून घेता येते.  नित्शेचे तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र  व विचार या पुस्तकात आहेत.  अर्थात हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याचे चरित्रही येथे दिल्यामुळे अभ्यासकांची मोठी सोय झाली आहे.

नित्शे हा मूलगामी आणि तात्त्विक प्रश्न उपस्थित करणारा तत्त्ववेत्ता आहे.  नित्शेला अस्तित्ववादी परंपरेचा आद्यप्रवर्तक समजले जाते.  नित्शेने जगाला सतावणाऱ्या प्रश्नांची केवळ चर्चा केली नाही तर त्यावर उपायही शोधले.

या महान तत्त्ववेत्त्याला समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फ्रेडरिख नित्शे : जीवन आणि तत्त्वज्ञान”

Your email address will not be published. Required fields are marked *