Description
विद्या हे धन असून त्याचे महत्त्व सावित्रीबाई काव्यामधून प्रतिपादन करतात.
‘जे करिती शेती । विद्या संपादती ।।
तया ज्ञानवंती । सुखी करी ।।
विद्या हे धन आहे रे ।
श्रेष्ठ साऱ्या धनांहून ।।’
सावित्रीबाईंनी विद्या व ज्ञानाचे महत्त्व केवळ मराठी भाषेतच नव्हे तर त्यांच्या एका संस्कृत सुभाषितांमध्ये ते अधोरेखित केले आहे. ते पुढीलप्रमाणे –
‘विद्यावित्तविहीनेन किकुलीनन दोहिनाम
अकुलीनोपि यो विद्वान दैवतैरपी पूज्यते’
(विद्या विरहित मनुष्य कितीही मोठ्या कुलातील तरी त्यास कोणी विचारत नाही. हीनकुलातील तरी त्यास कोणी विचारत नाही. हीनकुलातील विद्यावंतास जगही पूजते.)
– सावित्रीबाई जोतीराव फुले
Reviews
There are no reviews yet.