Description
अल्बर्ट आइन्स्टाईन हा जगाच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून गणला गेला आहे. बहुतेक लोक आइन्स्टाइनला अलौकिक बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत प्रतीक मानतात.
पण आइन्स्टाईन खरोखर कोण होता? एक व्यक्ती म्हणून तो कसा होता? अल्बर्ट आइन्स्टाईनच्या या नव्या चरित्राद्वारे, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांनाही या क्रांतिकारी माणसाचे जीवन आणि विज्ञान यांची संक्षिप्त परंतु सुगम ओळख होईल. आइन्स्टाईनच्या अलौकिक बुद्धीमागे त्याचे सामान्य व्यक्तित्व दडलेले होते. त्यात मानवी दुर्बलता आणि दोष होते; पण जोडीलाच लोकांना आकर्षून घेण्याची शक्ती, ‘विनम्रता, तीव्र विनोदबुद्धी आणि वैशिष्टयपूर्ण वागणूक होती.
अल्बर्ट आईन्स्टाईन : जीवनचरित्र या पुस्तकात तेजस्वी, विलक्षण बुद्धिमान वैज्ञानिकाचे जीवन आणि कारकीर्द यांचा संपूर्ण इतिहास समाविष्ट आहे, तो याप्रमाणे :
- त्याचे सुरुवातीचे शिक्षण. शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळावे म्हणून आइन्स्टाईनची धडपड, त्यातून ‘स्विस पेटंट ऑफिस’ मध्ये कारकून म्हणून काम करण्याची वेळ; त्याच काळात त्याचे प्रसिद्ध आणि क्रांतिकारक सिद्धांत तो घडवत होता.
- आइन्स्टाईनची जागतिक कीर्तिशिखरावर मजल; आणि त्या प्रसिद्धीचा सदुपयोग जागतिक शांततेसाठी करण्याचे त्याचे प्रयत्न.
- आइन्स्टाईनचे पदार्थविज्ञानातील योगदान.या पुस्तकात, पुढील वाचनासाठी उपयुक्त दुय्यम महत्त्वाची संदर्भ-सूची आणि आइन्स्टाईनच्या जीवनातील ठळक दिन विशेष सांगणारा जीवनपटही समाविष्ट आहे.
Reviews
There are no reviews yet.