Description
केवळ विचार करून कोणी श्रीमंत होऊ शकतो? होय! तुम्हाला श्रीमंत, समृदध आणि परिपूर्ण आयुष्य जगायचं असेल, तर आधी विचारांमध्ये श्रीमंती यायला हवी. या पुस्तकात नेपोलियन हिल श्रीमंतीचा हाच रहस्यभेद करत आहेत.
हे पुस्तक आपल्याला श्रीमंत बनण्याचं रहस्य तर सांगेलच, पण त्याबरोबर श्रीमंत लोकांची जीवनरहस्यही उलगडून दाखवेल. हे पुस्तक आपल्याला केवळ काय करायचं हे न सांगता, ते कसं करायचं हे देखील सांगेल. यातल्या तंत्रांची तुम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी कराल तर खऱ्या अर्थाने समृद्ध व्हाल. मग, जीवनात तुम्ही जे इच्छिता ते सर्व काही मिळवू शकाल. कारण आता तुमच्याजवळ असेल समृद्धीचा पासवर्ड !
या पुस्तकात वाचा :
- श्रीमंत होण्याची तीव्र इच्छाशक्ती
- इच्छा वास्तवात कशी आणावी
- आत्मविश्वास आणि श्रीमंती यांचं नातं
- स्वयंसूचना तंत्राचा प्रभावी वापर
- कल्पना करा आणि श्रीमंत व्हा
- इच्छेचं रूपांतर क्रियेत कसं करावं
- तुम्हाला काय हवंय ते ओळखा आणि मिळवा
- अडचणींवर मात करण्याचं रहस्य
- कमतरता आणि गरिबी यांचं समूळ उच्चाटन
- भीतीवर कायमचा विजय मिळवा
- अंतर्मनाच्या शक्तीने समृद्ध होण्याचं सूत्र
Reviews
There are no reviews yet.