Description
या ग्रंथात एकूण ५२२ गाथा असून त्या सोळा निपातात विभागल्या आहेत. या गाथांमध्ये आत्मशुद्धी, आत्मविजय आणि आत्मशांतीचा हर्षध्वनी निनादतो. अधिकांश गाथांमध्ये निब्बाणाचे संकेत मिळतात. नैतिकतेवर आधारलेले सत्य, हृदयाला सरळ सरळ भिडणाऱ्या गंभीर भावना, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वानुभव हे या गाथांचे वैशिष्ट्य आहे. जीवनातील अपरिमित दु:ख, दारिद्र्य, विषमता व अनेक प्रकारच्या यातनांनतर मिळविलेल्या विजयाचा हा मंगल ध्वनी आहे. ‘अहो ! मी किती सुखी आहे’ अशा प्रकारचे उदगार त्यांच्या तोंडून सहज बाहेर पडतात. ‘ निब्बाणाच्या परमशांतीचा मी साक्षात्कार केला आहे.’ या साक्षात्कारामुळे जीवनातील निराशावादाचे निराकरण करण्याचा संदेश देण्यात आला आहे. बुद्ध, धम्म आणि संघाला शरण गेल्यावर प्राप्त झालेल्या नवजीवनाची प्रेरणा या भिक्खुणी देतात.

Reviews
There are no reviews yet.