Description
दमयंतीच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आनंदात झाली, पण मध्यंतरी तिची अगदी ससे होलपट झाली. रेणुकेचे बालपण सुखात गेले, पण तिच्या सुखदू:खांविषयी बेफिकीर असलेल्या तिच्या नवऱ्याने अखेर तिची हत्या घडवली. सुकन्या आणि लोपामुद्रा यांच्या स्वप्नांचा चुराड़ा झाला. देवयानीला वैफल्यग्रस्त व्हावे लागले, तर शर्मिष्ठेला दडपणाखाली जगावे लागले. सत्यवती, अंबिका, अंबालिका यांच्या वाट्यालाही वेदना आहेच. निषाद स्त्रीचा प्रस्थापित व्यवस्थेच्या ‘यज्ञवेदी’ वर बळी दिला गेला. गांधारी डोळे असून आयुष्यभर आंधळी राहिली. हिडिम्बेने ज्याच्यावर मन जडले त्याची प्राप्ती केली, पण ती त्याचे कायमचे साहचर्य मात्र प्राप्त कारु शकली.

Reviews
There are no reviews yet.