नवा मंत्र नॅनो तंत्र

70.00

1 in stock

पुस्तकाचे नाव नवा मंत्र नॅनो तंत्र
लेखक चंद्रकांत सहस्त्रबुद्धे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

विज्ञान विकासात विचार वा उत्पत्ती, संकल्पना  मांडणे आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रयोगातून तो विचार वा ती संकल्पना सत्यात येणे यात कमी – अधिक काळ जात असतो. ‘क्ष’ किरणांसारखे काही शोध असे असतात, की ज्यांचा उपयोग ताबडतोब सुरू होतो. तो शोध सर्वमान्य होवून तो शब्द सामान्यांच्या तोंडी अर्थासह इतका रुळून जातो, की जणू तो शोध, त्याचा उपयोग गेली अनेक वर्षे अस्तित्वात आहे. काही संकल्पनेबाबत मात्र या उलट स्थिती असते. एखाद्या विचार किंवा संकल्पना कोणी मांडतो त्यानंतर ती प्रत्यक्षात यायला अगदी शतके जरी नाही तरी काही दशके उलटतातच. नॅनो तंत्राच्या बाबतीत असेच झाले.

नॅनोसारख्या तंत्रावर पुस्तक वाचल्यानंतर वाचकांची उत्सुकता वाढेल यात शंका नाही. उत्सुक वाचकांसाठी काही ख़ास बाबीही या पुस्तकात दिल्या आहेत. पुस्तके, नियतकालिके व काही वेबसाईटही दिल्या आहेत. त्याचा उपयोग माहिती मिळवताना सुरुवात म्हणून होईल. परदेशी व भारतात कोणकोणत्या ठिकाणी नॅनोवरचे अभ्यासक्रम आहेत याची जुजबी माहिती दिली आहे. याबरोबर एक शब्दसूची अर्थासह जोडली आहे. ही सारी परिशिष्टे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नवा मंत्र नॅनो तंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *