Description
मानवाला जसे आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेरील ग्रह, तारे, सूर्य आणि एकंदरीत संपूर्ण आकाशगंगेचे सातत्याने आकर्षण राहीले आहे तसेच त्याला सूक्ष्मतेचे गूढ ही सातत्याने आकर्षित करत असते. एका बाजूला वैश्विकतेच्या अफाट अशा विश्वाचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत असतो तर दुसऱ्या बाजूला सूक्ष्मतेतील सूक्ष्मतेचा वेध घेण्याचा ही त्याचा प्रयत्न असतो. विश्वाचा शोध घेण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मागील तीन शतकात विकसित जलयाचे आढळते. परंतु सूक्ष्मतेशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवासमोर विसाव्या शतकाच्या अखेरीस उलगडले गेले आणि एकविसाव्या शतकात त्याचे नवनवीन आविष्कार मानवापुढे येवू लागले आहेत. या विज्ञान आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या अविष्काराबद्दल सर्वांनाच सातत्याने कुतूहल वाटते कारण ते माणसाच्या दैनंदिन जीवनात बदल करू शकते. अशा या सूक्ष्मतेशी निगडीत असलेल्या नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञानाविषयी या पुस्तकात दिले आहे.

Reviews
There are no reviews yet.