Description
अन्न व औषध हे दैनंदिन मानवी जीवनासाठी अतिशय आवश्यक घटक आहेत. समाजाचे आरोग्य व जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी देखील अन्न व औषधांचा उपयोग होतो. औषध व्यवसायाद्वारे लोकांना योग्य ती सर्व सेवा व लाभ मिळावा. तथापि औषध व्यावसायिकांनादेखील योग्य न्याय मिळावा असे वाटते. बऱ्याचदा कायद्याच्या अज्ञानतेमुळे औषध व्यावसायिकांना अनेकदा त्रासदायक कार्यवाहीला सामोरे जावे लागते त्यामुळे या सर्व औषध व्यावसायिकांना कायद्याचे ज्ञान अवगत होणे अनिवार्य आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. औषध विक्री कायद्याचे योग्य ज्ञान व त्याविषयी जागरूक असलेला औषध व्यावसायिक हा नक्कीच या समाजाच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक देणगी ठरेल.
या पुस्तकात ” औषधे व जादूटोणादी ( आक्षेपार्ह ) जाहिराती कायदा 1954 ” च्या तरतुदी देखील सोप्या भाषेत विशद करून किरकोळ व घाऊक औषध विक्रीशी या कायद्याचा संबंध अधिक स्पष्ट व प्रभावीपणे मांडला आहे. यापूर्वी इंग्रजीत औषध कायद्याची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण नेमके किरकोळ व घाऊक औषध विक्रीच्या कायदेशीर तरतुदींशी संबंधित हे महाराष्ट्रात पहिलेच पुस्तक आहे.
या पुस्तकात संक्षिप्त समावेश –
- औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945
- औषध व्यवसाय अधिनियम 1948 व त्या खालील महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद नियम 1969
- औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व त्याखालील नियम
- नारकोटिक्स व साइकोट्रॉपिक सबस्टेंसेस कायदा 1985 व त्याखालील महाराष्ट्र राज्याचे नियम औषध किंमत नियंत्रण आदेश 2013
Reviews
There are no reviews yet.