प्राचीन वैद्यक जीवन

₹180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव प्राचीन वैद्यक जीवन
लेखक अनिलकुमार रॉय
ISBN 978-81-923546-8-2
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

प्राचीन भारताच्या इतिहासाची रचना करताना, सर्वका विवेकवादी इतिहासकारांनी बौद्ध काळावरचा भर दिला आहे; बुद्ध-मौर्य काळाच्या इतिहासापासूनच भारतीय इतिहासाची व्यापक आणि ठोस पायावर मांडणी करता येते, असे प्रतिपादनही केले आहे. खरे तर सबंध वैद्यक शास्त्राचाच – मग तो पाश्चात्य असो वा भारतीय असो – त्याचा पायाच कार्यकारणभावाचा सिद्धांत आहे. चार आर्यसत्ये त्याची सुस्पष्ट मांडणी आहे. तथागतांनी स्थापित केलेल्या चार आर्यसत्यांच्या चौकटीत आजच्या वैद्यकशास्त्राची संपूर्ण प्रक्रिया रोग, रोगाचे कारण, कारणांचा शोध (निदान), रोगांच्या कारणांचे निरोध, रोगाच्या कारणांचा निरोध करण्याची प्रक्रिया (उपचार) आणि अखेरीस रोगमुक्ती ही सर्व श्रृंखला दु:ख आहे, दुःखसमुदाय (कारण) आहे, दुःख निरोध, दुःखनिरोध गामिनी प्रतिपद (मार्ग) म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग यावर आधारलेली आहे. ती बुद्धपरंपरेतील विवेकवादी तत्त्वांवर आधारलेली आहे. हिंदू ब्राह्मणी किंवा इतर कोणत्याही चैतन्यवादी/ चिदवादी तत्त्वज्ञानावर आधारित नाही. चिदवादी विचार आपल्या आजाराचे कारणही मागील जन्मातील पापपुण्यावर, देवादिकांच्या वक्रदृष्टीवर, ब्राह्मण सन्याशांच्या, ऋषींच्या शापावर, ग्रहताऱ्यांच्या  शनी, राहुकेतूच्या कुयोगावर ढकलून मोकळे होते. परंतु बुद्धतत्वज्ञान मात्र दुःखाचे (रोगाचे) कारण माणसाच्या वर्तनामध्ये आणि त्याच्या परिवेशामध्ये शोधते आणि त्याच्या निराकरणाचा मार्ग सुचवून रोगमुक्ती (दुःखमुक्ती) प्रशस्त करते. असे असेल तरी भारतीय वैद्यक शास्त्राचे पायाभूत तत्त्वज्ञान बुद्धाचा प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राचीन वैद्यक जीवन”

Your email address will not be published. Required fields are marked *