विद्रोही तुकाराम । डॉ. आ. ह. साळुंखे

*डॉ. आ. ह. साळुंखे* यांनी १९९७ साली *”विद्रोही तुकाराम”* हे पुस्तक लिहले. विद्रोही या नावाचे अनेकांनी वेगळेच अर्थ काढले. आणि गैरसमज होत गेले. डॉ.आ.ह.साळुंखे आपल्या पुस्तकात म्हणतात, *विद्रोही या शब्दाचा अर्थ अन्यायाविरुध्द लढा उभारणारे असा आहे. द्रोही या शब्दाच्या अर्थाशी त्याचा काहीही संबंध नाही. शब्दाच्या अर्थाविषयी गैरसमज झाल्यामुळे हा शब्द तुकारामांचा अनादर करणारा आहे, अशी काही लोकांची भावना झाली. वस्तुतः, हा शब्द तुकारामांविषयीच्या कमालीच्या आदरभावनेने योजलेला आहे.* हया पुस्तकाचा विस्तार मोठा असून पानांची संख्या ४२० असून *किंमत ३८० रूपये* असून हे *पुस्तक १६ वेळा पुर्नमुद्रित झाले आहे.* पुस्तकाची अनुक्रमणिका* १.सिंहाचे चित्रण शेळीच्या स्वरुपात २.वेदांचा अंकित नसल्याची घोषणा ३.यातिकुळ येथे असे अप्रमाण ४.काय बा करिशी सोवळे ओवळे ? ५.कोणी गुरु नाही, कोणी शिष्य नाही ६.आम्ही नशीब लिहिणाऱ्या देवाचे स्वयंभू बाप आहोत ? ७.न्यायालयात खेचले ८.मरणाही आधी राहिलो मरोनी ९.विचारांची कत्तल ही शारीरिक हत्येपेक्षाही भीषण *संदर्भसूची *परिशिष्टे *उल्लेखसुची या प्रकरणांच्या माध्यमातून हा ग्रंथ सिद्ध होतो. हा ग्रंथ म्हणजे तुकाराम महाराजांच्या विचारांची आणि सामाजिक उंच्चीची जाणीव करून देणारा असुन सत्य जगासमोर मांडणारा असा आहे. हया ग्रंथातून तुकाराम महाराजांच्या अनेक पैलुंवर प्रकाश टाकण्यात आला असून “तुका आकाशा ऐवढा” यांची प्रचिती देणारा आहे. आपल्याला तुकाराम महाराज नक्कीच माहीत आहेत पण हया पुस्तकातून आपल्याला ते खरे तुकाराम महाराज माहीत होतील असे आम्हाला वाटते. हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचण्याची, समजून घेण्याची आपल्या इच्छा असल्यास किंवा आपल्याला, आपल्या मित्राला हे पुस्तक हवे असल्यास कृपया आम्हाला त्वरीत आपले पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड सहित आणि ईमेल आयडी असल्यास *सनय प्रकाशनाच्या व्हाट्स अप (Whats app) च्या 8652121912 । 8626085734 । 8180031734 । 9096596768 या नंबर वर पाठवा किंवा 8180031733 । 9860429134 ।* या नंबर वर आम्हाला त्वरित फोन करा. आम्ही हे पुस्तक आपल्यापर्यंत घरपोहच करू. भारतात कोठेही कोणताही पोस्टेज/टपाल खर्च न आकारता, कृपया यांची नोंद घ्यावी. धन्यवाद । आम्ही आपले आभारी आहोत.। ◆◆

Copyright www.sanaybooks.com. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

2 thoughts on “विद्रोही तुकाराम । डॉ. आ. ह. साळुंखे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *