Description
भारतीय संदर्भात इहवादाचा एक वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण अर्थ लावला पाहिजे असा युक्तिवाद अनेकांनी केला आहे. हा अर्थ असा की, इहवाद म्हणजे सर्वधर्मसमभाव. ह्या युक्तिवादाचे सार असे : भारतीय समाज हा आज तरी एक धार्मिक समाज आहे. शिवाय ह्या समाजाची ऐतिहासिक घडण अशी झाली आहे की, हा बहुधार्मिक समाज आहे. भिन्न धार्मिक जमातींचा मिळून हा समाज बनला आहे. बहुसंख्य भारतीय व्यक्ती- स्त्री-पुरूष हे कोणत्या तरी धार्मिक जमातीचे घटक म्हणून जगतात. त्या जमातीची जी धार्मिक श्रद्धा असेल तिला अनुसरून तिच्या आधार जगतात. ही श्रद्धा भाबडी, अशिक्षित, जी केवळ कौटुंबिक व सामाजिक परंपरेपासून व्यक्तीला प्राप्त झालेली असते अशी असेल. पण बहुसंख्य भारतीय व्यक्तींच्या जीवनाचा आशय, त्यांची नैतिक मूल्ये, जीवनाची साध्ये, आदर्श त्यांच्या धार्मिक श्रद्धेने घडविलेले असतात. हे सामाजिक वास्तव आहे. आता भारतीय समाज, आणि भारतीय राज्यघटनेवर आधारलेले भारतीय राज्य ह्यांत भेद केला पाहिजे, ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे हे उघड आहे.

Reviews
There are no reviews yet.