Description
”सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यामुळे क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेज:पुंज दिसतो. पण बुद्धमात्र स्वयंतेजाने दिवस-रात्र सतत प्रकाशित राहतो.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक. बौद्धधर्म प्रवर्तक व महान बोधिसत्त्व होते. तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरुत्थानक होते. एकेकाळी भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवित केला. 30 मे 1936 रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात ‘अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल’ असे प्रतिपादन केले. म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार इसवी सन 1936 पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून येते.
बौद्ध धर्मातील धर्मांतराने आंबेडकरांच्या तर्क, नैतिकता आणि न्यायाच्या जटिल आवश्यकता पूर्ण केल्या आहेत असे मानले जाते. एप्रिल-मे 1950 च्या महाबोधीमध्ये ‘बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य’ या लेखात डॉ. बाबासाहेब म्हणाले, ” जग जर कोणता धर्म स्वीकारु शकेल तर तो बौद्ध धर्म होय.”

Reviews
There are no reviews yet.