स्त्री-लिखित मराठी कथा (१९५० ते २०१०)

630.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्त्री-लिखित मराठी कथा (१९५० ते २०१०)
लेखक अरुणा ढेरे
ISBN 978-93-82161-90-5
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७४० ग्रॅम

Description

स्त्री-लिखित मराठी कथा (१९५० ते २०१०) हा या प्रकल्पाचा दूसरा खंड आहे. कमल देसाई यांच्यापासून मोनिका गजेंद्रगडकर यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांच्या अकरा स्त्री- कथाकार या खंडात विचारार्थ निवडल्या आहेत. एक सार्वजनिक व्यक्ती म्हणून या  लेखिकांची घडण कशी झाली. त्यांच्या कथेचे विषय त्यांनी कसे आणि का निवडले, मानवी समाज, सामाजिक संस्था, साहित्य, धर्म, राजकारण। नातेसंबंध आणि संस्कृतिविषयी या लेखिकांच्या प्रतिक्रया काय आहेत. समकालीन कथेकडे आणि वाङ्मयीन परंपरेकडे त्या कशा पाहतात. माध्यमांशी त्यांचे नाते कसे आहे आणि आणि त्यांची एकूण जीवनदृष्टी कशी आहे. कशी घडली आहे, या अनुषंगाने घेतलेल्या या मुलाखती आहेत.

या मुलाखतींमधून समकालीन कथा लेखिकांच्या सर्जनप्रक्रियेची ओळख तर व्हावीच पण मराठी कथाविश्वाच्या संदर्भातही त्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान स्पष्ट व्हावे, अशा हेतूने मुलाखती आणि जोडीला त्या लेखिकेची प्रातिनिधिक कथा अशी या खंडाची योजना केली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्त्री-लिखित मराठी कथा (१९५० ते २०१०)”

Your email address will not be published. Required fields are marked *