Description
आज अनेक क्षेत्रात महिला, पुरुषांच्या बरोबरीनं, खांद्याला खांदा लावून काम करताना आढळून येतात. तरीही स्त्री-संशोधकांची नावं सांगा असं म्हटलं तर मात्र मेरी क्यूरी सोडून झटकन चार नावं सांगणं अवघड होतं. पर्यावरण आणि मानव – वंशशास्त्रात स्त्रियांनी संशोधनाचा फार मोठा वाटा उचलला आहे. प्रसंगी पर्यावरण संरक्षणासाठी प्राणार्पण केलं आहे. मानवशास्त्रात इतरही काही क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व गाजवलं आहे. या पुस्तकात अशा दिग्गज महिलांच्या संशोधनाची माहिती आहे. त्यातलं काही संशोधन वादग्रस्त कसं ठरलं, तेही दिलं आहेच. इतर क्षेत्रांतील महिलाही इथं येतात. डायना फॉसीला मारल्यावर तिच्या खुन्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय पातळीवर कसे प्रयत्न झाले, हेही वाचायला मिळेल.

Reviews
There are no reviews yet.