Description
धर्मशास्त्राने लादलेली बंधने, पुरुषप्रधान संस्कृती आणि परकीय राजसत्तेचे आक्रमण या तीन वरवंट्याखाली भरडलेल्या स्त्री जीवनाला सन्मान, आदर व आत्मविश्वास बहाल करण्याचे ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
स्त्रियांना दासी – बटकिणी म्हणून विकू नये, इथपासून शत्रूच्या स्त्रीवरदेखील बदआलम करू नये, इथपर्यंत आदेश देणारा लोककल्याणकारी राजा आजच्या काळात देखील आश्चर्यचकित करून सोडतो. संत तुकारामांचे विचार प्रमाण मानून ‘परविया नारी माउली समान’ मानणारे छत्रपती शिवराय होते. त्यांनी स्त्रियांचे फक्त संरक्षणच केले असे नव्हे, तर त्यांना निर्णय प्रक्रियेत, राज्यकारभारात, न्यायदान प्रक्रियेत काम करण्याची संधी दिली. स्वत: शाक्त पंथाचे उपासक असणाऱ्या शिवरायांनी स्त्री सन्मानाची भूमिका स्वीकारली. या सर्वांची अभ्यासपूर्ण व साधार मांडणी डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी या छोट्याशा पुस्तिकेत केलेली आहे. ‘छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन’ समजून घेण्यासाठी ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या भारतीय समाजात छत्रपती शिवरायांचा हां स्त्रीविषयक उदात्त दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे.

Reviews
There are no reviews yet.