आईन्स्टाईनचे मनोविश्व

360.00

Out of stock

पुस्तकाचे नाव आईन्स्टाईनचे मनोविश्व
लेखक मो. रा. गुण्ये
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ५१२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५६० ग्रॅम
Category:

Description

विसाव्या शतकातील एका युगप्रवर्तक आणि प्रतिभावंत अशा शास्त्रज्ञाचे जीवन, संशोधन आणि तत्त्वचिंतन, यांचा मागोवा ”आईन्स्टाईनचे मनोविश्व” या पुस्तकात घेण्यात आला आहे. आइन्स्टाईनच्या मूलभूत संशोधनामुळे मानवी आकलनाचे क्षितिज अमर्याद पसरले गेले आहे.  त्याच्या सिद्धांतानी केवळ विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा कायापालट झाला एवढेच नाही, तर त्यांनी घडविलेल्या भौतिक विश्वाच्या वास्तवदर्शनाने मानवाच्या ज्ञानभांडारात आणि विचारधारेत मौलिक भर पडली आहे.

आइन्स्टाईनच्या कृतार्थ आयुष्यावर दृष्टी टाकताना विविध ज्ञानशाखांचे दर्शन घडते.  उदात्त जीवनमूल्यांची जाणीव होते.  सत्य, सौंदर्य शिवत्व यांचे भान जागे होते. सांकेतिक प्रावीण्य आणि जीवघेणी स्पर्धा, यांचे प्रस्थ माजल्यामुळे माणसाचे सांस्कृतिक जीवन आज उद्ध्वस्त होत आहे.  अशा परिस्थितीत, विज्ञानाला मंदिर आणि जिज्ञासेला पवित्र मानणाऱ्या या अलौकिक मानवाने आपणा सर्वांना केलेले आवाहन महत्त्वाचे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आईन्स्टाईनचे मनोविश्व”

Your email address will not be published. Required fields are marked *