अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य

120.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य
लेखक विजयकुमार जोखे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम
Category:

Description

एक मुलगा बापाचे बोट धरून, वाटेगावहून पायी चालत, पोट भरण्यासाठी १९४२ मध्ये मुंबईस आला होता. येता येता वाटेत दोघा बापलेकांनी टाटाच्या रेल्वे वाघिणीवर कोळसे उतरण्याची हमाली केली. सह्याद्री घाटातून लक्षावधी लोक मुंबईत येताहेत. अजूनही हा क्रम चालू आहे हा पोऱ्याही असाच खाली उतरला आणि पुढे त्याने इथल्या प्रचंड महानगरात यंत्राशी आपली सोयरीक जोडली. अगदी कसलीही कुरकूर न करता जोडली. पोट भरण्यासाठी नांगर झाला आणि ह्या प्रचंड नगरातील घडामोडींवर लिहू लागला.
परवा, १८ जुलै, १९६९ हा वाड्मयाच्या कारखान्यातील धडाडता बॉयलर एका साध्या काथ्याच्या चारपायीवर विझला. विझताना जवळ कोणी नाही. पलीकडे राहणाऱ्या मिसेस राव आपल्या आणि त्यांनी या बेवारशी माणसासारख्या मरण पावलेल्या लेखकावर आपल्या घरातली चादर आणून घातली. नाकातोंडात कापसाचे बोळे घातले. खोलीत, शेजारपाजारच्या दोनचार बायका, भिंतीवर टांगलेली त्या पोराची एक तसबीर आणि कोपऱ्यात गंभीर चेहऱ्याने त्या प्रेताकडे पाहत विचार करणाला मॅक्झिम गॉर्कीचा छोटासा पुतळा. बस्स ! एवढेच. या देशात मरण स्वस्त आहे हेच खरे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य”

Your email address will not be published. Required fields are marked *