Description
व्यक्ती आणि समाज यांच्यात सम्यक समन्वय साधून, व्यक्तिविकासास पूर्ण स्वातंत्र्य देऊन समाज सुसंस्कृत बनविण्याचा मार्ग म्हणजे भगवान् बुद्धांचा माध्यम मार्ग. माणसाने स्वत: च्या विकासाबरोबरच समाजाचाही विकास साधला पाहिजे, अशी शिकवण भगवान बुद्धांचा धम्म देतो. गोरगरिबांची पिळवणूक करणारी, मजूरांचे शोषण करणारी भांडवलशाही हे एक टोक, आणि व्यक्तीला नगण्य समजणारी, व्यक्तिस्वातंत्र्याला डांबून टाकणारी कम्युनिस्टांची समाजव्यवस्था हे दूसरे टोक. ही दोन्ही टोके सोडून भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग व्यक्तिविकासाबरोबरच समाज विकासाची शिकवण देतो. म्हणूनच आजच्या काळात भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गाची जगाला शिकवण देणे जास्त आवश्यक आहे.
जगात प्रत्येक माणसाला दु:ख भोगावे लागते. ज्याला दु:ख भोगावे लागले नाही असा एकही मनुष्य जगात मिळणार नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे दु:ख मुक्तीचा मध्यम मार्ग.

Reviews
There are no reviews yet.