Description
पुण्यापासून सुमारे पंचवीस कि.मी. अंतरावर पुरंदरच्या टेकडीच्या ईशान्येस भिवडी या गावांत इसवी सन १७९१ मध्ये जन्मला तो हा ‘उम्या’ उर्फ़ उमाजी नाईक उर्फ़ उमाजी राजे ! एक अट्टल दरोडेखोर, रामोशी ! सुमारे १११० दरोडे घालणाऱ्या दादजीचा हा मुलगा !
मराठ्यांच्या इतर किल्ल्यांप्रमाणे पुरंदरावर देखील बंदोबस्तासाठी हे रामोशी होते. पुरंदरचा गड सांभाळून आवश्यक तेव्हा पेशव्याला योग्य ती चाकरी देणे हाही त्यांच्या कर्तव्याचा हा भाग होताच. त्याकाळी परंपरेने उघड उघड दरोडे घालणारी माणसे पद्धतशीरपणे सरकारी नोकर धरली जायची हा प्रकार आज विचित्र वाटेल. पण, आपल्या जाहिरनाम्यात इंग्रजांनी सर्वांची वतने, हक्क, इनामे कायम ठेवण्याची हमी देऊनही या जमातीबाबत काय धोरण ठेवावे याचा निर्णय केला नाही.
अशा बेरड, कुणाची हुकमत न जुमानणाऱ्या तसेच, शस्त्रविद्या, सांकेतिक भाषा, वेशांतरे करून बातम्या काढणे या कला अवगत असणाऱ्या या जमातीतील स्त्रियादेखील तत्पर व धाडसी होत्या. याच कुटुंबातील एका चपखल, दिसायला सौम्य पण अंगी क्लुप्त्या व प्रचंड धाडस बाणणाऱ्या उमाजी राजेंची ही क्रांतिकारक चरित्रकहाणी !

Reviews
There are no reviews yet.