छत्रपती शिवाजी महाराज

पुस्तकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज
लेखक कृष्णराव अर्जून केळूसकर
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या --
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन --
Category:

Description

छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सतसंकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती – धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे एक उत्तम चरित्र आहे.  केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे  इथल्या रयतेचे भाग्य !

आज राष्ट्रभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन अंगीकार करने क्रमप्राप्त आहे.

गुरुवर्य कृष्णराव अर्जुन  केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पाहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, केळूसकरकृत शिवचरित्रएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकर आहेत. केळूसकरकरांनी शिवाजी महाराजांचे संक्षिप्त स्वरूपातील चरित्रही लिहिले होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छत्रपती शिवाजी महाराज”

Your email address will not be published. Required fields are marked *