Description
सिमोन द बोव्हुआर ‘ द सेकंड सेक्स’ हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते. स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांनी चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नाही, तर प्राणी जगतातील नर – मादी हा जीव शास्त्रीय फरकसुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो, याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर – मादी या दोन वर्गांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्तिमित होतो. सीमोनची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतीकरण यांची ताकद एवढी प्रचंड आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, वा पुरूष, एका निराळ्या ( आणि अधिक स्वच्छ) नजरेने स्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते. जगभर गाजलेला हा ग्रंथ आता मराठीत उपलब्ध होत आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
Reviews
There are no reviews yet.