Description
स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान म्हणून नेहरूंनी आपली जबाबदारी पार पाडली होती. देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे महत्त्व सांगितले होते. औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली होती. धार्मिक आणि जातीय भावना राष्ट्रीय ऐक्याच्या आणि प्रगतीच्या आड येऊ नयेत, असा प्रयत्न केला होता. पाकिस्तान आणि चीन यांच्या आक्रमणाचा उपलब्ध साधनांनी धैर्याने प्रतिकार केला होता. संसदेत प्रचंड बहुमत असतानासुद्धा विरोधी पक्षाचा आदर केला होता. प्रत्येक महत्त्वाची धोरणविषयक गोष्ट स्वत: संसदेला सांगितली होती. देशातल्या साहित्यिकांना आणि विचारवंतांना विचारस्वातंत्र्य टिकवण्याचे आवाहन केले होते. शक्य असूनही आपल्या लोकप्रियतेचे रूपांतर हूकूमशहात होऊ दिले नव्हते.
Reviews
There are no reviews yet.