Description
भारताच्या युवाशक्तीला स्वातंत्र्यपूर्वकालीन घटनांचा, विशेषतः ती घडवणाऱ्या व्यक्तीचा म्हणावा तेवढा परिचय नाही ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विशाल, तेजस्वी, निस्सीम कार्याची त्यांना खरी ओळख नसण्याचाच संभव अधिक. ‘फ्रीडम…’ वाचताक्षणी त्या थोर राष्ट्रपुरुषाच्या ठायी आढळणाऱ्या अनेक अलौकिक गुणविशेषांचे दर्शन होते. परकीयांच्या नजरेतून झालेले त्यांचे मूल्यमापन वाचताना ऊर भरून येतो. या ग्रंथाच्या, पर्यायाने भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या पानापानावर महात्माजींचा ठसा उमटलेला दिसेल वाचकांना. या पुस्तकाचा अनुवाद मराठी वाचकांसमोर ठेवण्यात आम्ही त्या सर्वश्रेष्ठ भारतीयाला एक प्रकारची श्रद्धांजलीच वाहत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यसंगरातील अनेक तेजस्वी अध्यायांपैकी सर्वश्रेष्ठ असा अध्याय म्हणजे गांधींजींचे हौतात्म्य!
Reviews
There are no reviews yet.