Description
वसंतरावजी नाईक म्हणजे राजबिंडे व्यक्तीमत्व, कायद्याचे अभ्यासक, विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि आपला पक्ष आसो वा विरोधी पक्षातील नेते आणि आमदार, कार्यकर्ते लोक भावना ओळखणारे विचारवंत होते. आपला बंजारा समाज निरक्षर-अडाणी, अंधश्रद्धाळू अपार कष्ट करणारा परंतु अनेक व्याधी व्यसनाधिनतेच्या आहारी गेला होता. म्हणून या सर्व विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांनी शिक्षणाचा प्रसार – प्रचार करण्यासाठी आपल्या बंजारा समाजातील जाणकार लोकांना शाळा, आश्रम शाळा, कॉलेज, मोफत वसतीगृहे मंजुरी देऊन ती सुरू केली. नाईकसाहेब म्हणजे हाडाचे शेतकरी, त्यामुळे त्यांच्या मनात शेतकरी राजा सुखी होऊन कारखानदार झाला पाहिजे ही भावना सदोदित जागृत राहीली. याच भावनेतून की काय तर कृषी योजनेमार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुधारित व संकरित बियाणे आपल्या शेतात वापरून भरघोस उत्पादन काढून अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करावे हीच त्यांची तळमळ होती. यासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात कृषी, सहकार क्षेत्रात साखर कारखाने, सुतगिरण्यांची निर्मिती केली. मोठी धरणे बांधून जलसिंचन योजना आखल्या, सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, तसेच सामान्य जनांच्या हितासाठी सामाजिक चळवळ उभी करून आदिवासी, बंजारा,, विमुक्त जाती-भटक्या जमाती, बहुजन समाजातील गोरगरीब – कष्टकरी जनतेच्या उत्थानासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला काम, स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून रास्त किंमतीत धान्य उपलब्ध करून देणे या आणि अशा अनेक शासकीय योजना राबविल्या. त्यामुळेच त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होऊन देशातील एक अग्रेसर म्हणून नावारूपास आले.
Reviews
There are no reviews yet.