Description
लोकांना वाटतं की, आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर आपल्याला काही महान विचार केला पाहिजे; पाना सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर यांनी यापेक्षा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. परिवर्तन हे खरं तर छोट्या – छोट्या शेकडो निर्णयांनी साधलेला संयुक्त प्रभाव असतो, असं जेम्स क्लियर मानतात. या छोट्या निर्णयांमध्ये ते प्रत्येक दिवशी दोन पुश-अप्स, नेहमीच्या वेळेपेक्षा पाच मिनिट आधी उठणं आणि दररोज एक पान जास्त वाचणं यांसारखी उदाहरणं देतात; यालाच ते …….. म्हणतात.
या क्रांतिकारी पुस्तकात क्लियर सांगतात की, छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशा प्रकारे घडवून आणतात. ते काही सोपी तंत्र सांगतात, ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल. या तंत्रामध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला, दोन मिनिटांच्या नियमाची ताकद आणि गोल्डीलॉक्स झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात. हे छोटे बदल महत्त्वपूर्ण का ठरतात, याचा ते आधुनिक मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स यांतील गहन संशोधनांच्या आधारे मागोवा घेतात. शिवाय ते ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते, यशस्वी सीईओ आणि ख्यातकीर्त वैज्ञानिकांच्या प्रेरककथाही सांगतात, ज्यांनी उत्पादक, प्रेरित आणि प्रसन्न राहण्यासाठी छोट्या सवयींच्या मांगे असलेलं विज्ञान आपलंसं केलं आहे.
हे छोटे बदल तुमचं करिअर, नातेसंबंध आणि जीवन यांत परिवर्तन घडवतील.
‘हे मनमोहक आणि व्यावहारिक पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुमची चुकीची दिनचर्या सोडण्यासाठी आणि चांगली दिनचर्या विकसित करण्यासाठी या मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे’
‘तुम्ही तुमचा दिवस आणि जीवन कसे व्यतीत करता, याविषयीचा तुमचा दृष्टिकोण बदलणारं पुस्तक.’
Reviews
There are no reviews yet.