Description
दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब प्रत्यक्ष बनवणाऱ्या शास्त्रज्ञामध्ये नोबेल पुरस्कारप्राप्त रिचर्ड फाईनमनचा प्रचंड मोठा सहभाग होता. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची नुसतीच गोडी नव्हे, तर त्यात सखोल ज्ञान आणि प्रावीण्य असणाऱ्या फाईनमननं क्वांटम मेकेनिक्स, क्वांटम इलेक्ट्रोडायनमिक्स अणि भौतिकशास्त्र या विषयांत सखोल काम केलं. फाईनमननं नेनो टेक्नोलॉजीच्या तंत्रज्ञानाची चाहूल सर्वप्रथम 1959 सालीच व्यक्त केली.
फाईनमन जरी जन्मानं ज्यू असला, तरी तो मानवता हाच धर्म मानायचा आणि विज्ञानाचा प्रचंड प्रेम करायचा. तसं पाहता रिचर्ड फाईनमनचं आयुष्य स्थिरपणे गेलचं नाही. सर्वसामान्यांसारखा तोही कित्येकदा भरकटला. पण ते भरकटलेपण, त्या चुका जगासमोर मांडण्याइतका तो पारदर्शी होता. तो सर्वसामान्यांमध्ये होता, पण तो त्यांच्यापेक्षा वेगळा होता. आपल्याबरोबर सतत एक खोडकर मूल घेऊन तो एक वादळी आयुष्य जगला. पण या वादळाला जराही न घाबरता आपलं विज्ञानावरचं प्रेम, संशोधन, नवं काही शिकण्याची ऊर्मी आणि आनंदी राहण्याची वृत्ती त्यानं टिकवून ठेवली. त्याचं काम, त्याचं कर्तृत्व, त्याचं मनस्वीपण, त्याच्यातलं कुतूहल, त्याचं संवेदनशील असणं, त्याच्यातला संशोधक, त्याच्यातला चित्रकार आणि संगीतकार, त्याच्यातला शिक्षक, याच्यातला प्रियकर जेव्हा हे जग सोडून गेला, तेव्हा मात्र आख्ख्या जगाचे डोळे पाणावून गेला !
Reviews
There are no reviews yet.