Description
संदीप वाकचौरे यांनी या पुस्तकात शिक्षणांच्या संदर्भाने सृजनांच्या अनेक वाटांचे दर्शन घडविले आहे. बालकांच्या आत जे काही दडले आहे ते बाहर काढ़ने हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपण शिक्षण प्रक्रियेत काय करायला हवे? बालकांकडे नेमके कशा दृष्टीने पहाण्याची गरज आहे याबाबतचे दिशादर्शन वाचकांना सातत्याने घडत राहते. पुस्तकातील अनेक लेखांचे विषय हे नेहमीच्या शिक्षण प्रक्रियेशी संबंधित असेल तरी त्या विषयांकडे सूक्ष्मतेने पहाण्याची दृष्टी वाचकांना निश्चितपणे मिळते. त्यासाठी त्यानंनी दिलेले समर्पक उदाहरणांमुळे वाचकांपर्यंत विषय पोहचण्यास निश्चित मदत झाली आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षक, पालकांना या पुस्तकातून शिक्षण आणि बालकांकडे पहाण्याची दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे.
Reviews
There are no reviews yet.