भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस
लेखक संजीव चट्टोपाध्याय
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २०१ ग्रॅम

Description

महाभारताचं महायुद्ध समाप्त झालं. कौरवांच्या कुळाचा पूर्ण संहार झाला होता. सगळी युद्धभूमी प्रेतांच्या खचाने भरून गेली होती. रक्ताच्या ओहळांनी भिजून गेलेल्या भूमीवर, तो मुत्सद्दी  राजकारणी, रणनीतिकार कृष्ण उभा होता आणि त्याच्या आजूबाजूला होत्या कुरू स्त्रिया, ज्यांचे पती, बंधू, पिता आणि पुत्र युद्धात बळी गेले होते. त्या त्याला शिव्याशाप देत होत्या. या भयकारी स्थितीला जबाबदार कोण होता? दुसरा – तिसरा कुणी नाही, तर स्वत: प्रभु, परमेश्वर. ज्याने स्वत: जाहिर केलं होत की, पृथ्वीला पापांच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी तो अवतार धारण करेल. त्यामुळे जेव्हा मातांनी त्याला ‘तुझ्या नशिबीदेखील असेच भोग येतील’ असा शाप दिला, तेव्हा परमेश्वराने तो मंदस्मित करत शांतपणे स्वीकारला.

अशा प्रकारे या कादंबरीची सुरवात होते, ज्यात लेखक संजीव चट्टोपाध्याय प्रभु कृष्णाच्या जीवनाचा धांडोळा घेतात. विष्णूच्या अवतारांपैकी एक असलेल्या या अवताराच्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांकडे निर्देश करतात – गोकुळातला खट्याळ मुलगा, वृंदावनातला  रहस्यमयी प्रेमिक, कंसाचा वध करणारा, द्वारकेमधला यादवांचा प्रमुख आणि अखेरीस कुरु क्षेत्रावरच्या महायुद्धाची आखणी करणारा मुत्सद्दी राजकारणी!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस”

Your email address will not be published. Required fields are marked *