Description
”बदल” ही माझी चौथी कादंबरी. ”बदल” हाच विषय आहे. तरुणांसाठी मुख्यत्वे तिची मांडणी केलीय. म्हटलं तर ही एकविसाव्या शतकाची कादंबरी आहे!
गेल्या तीस वर्षात जो बदल झाला! हां बदल जेवढा सुंदर आहे, तेवढाच भयंकरही आहे. तो एकाच वेळी रोचक आणि जाचक आहे. तो देशी – विदेशी, शहरी – ग्रामीण, आस्तिक – नास्तिक, शाकाहारी – मांसाहारी, उदार – स्वार्थी असाही आहे. ही कादंबरी बिनधास्तपणे या बदलाला भिडते – मांडते. इथे कोणताही अभिनिवेश नाही. आहे टी फक्त बदलातील सत्याची आणि सत्यातील बदलाची मांडणी! – कोणत्याही टोळ्यांचा किंवा ईझमचा आधार न घेता.
कादंबरीत विविधांगी बदलाच्या घटना समांतरपणे, वेगाने, टोकदारपणे तर कधी हळूवारपणे परंतु स्पष्टपणे पुढे सरकत राहतात. बदल अनिवार्य आहे पण बदलाचा गाभा हां आनंदाचाच असला पाहिजे! मन आभाळा सारखं मोठं, खुलं नि स्वच्छ असलं कि एकमेकांच्या बदलांना आपण सहज स्वीकारतो! मग सारं विश्र्वच एक सुंदर घर बनतं. ही कादंबरी म्हणजे आभाळा एवढं मन असणाऱ्या लोकांची संघर्षगाथा आहे जे बदलाला सहजपणे सामोर जातात.
विज्ञान आणि विवेक यामधील सांस्कृतिक धागा जगभरात सर्वत्र कमजोर होतो आहे. फक्त ‘मी आणि माझं’ या संकुचित विचारधारेत आपन सारे आकुंचित होत आहोत. ही कादंबरी या भयावह ऱ्हासाला मांडत जाते. ही कादंबरी एकाच वेळी अठरा पगड जातीतल्या नई धर्मातल्या मित्रांची, स्त्री – पुरुषांच्या अगम्य प्रेमाची, स्त्रीवाद व पुरूषवाद यातील गोंधळाची, पुरूषी वासनांची, शोषणाची आणि पोषणाची, जागतिकीकरणातील घुसमटीची नि ओरबा डून खाण्याची, वंशवाद नि जातीवादाची, देशी आणि विदेशीवादाची व सभ्य – असभ्यतेची, नास्तिक – आस्तिकवादाची नि शेतकरी – कष्टकरी लोकांची वेगवान कथा आहे. ही कथा मुंबईहून सोलापूर नि न्यूयॉर्कहून मुंबई अशी फिरत राहते. सोलापुरहून ती सांडव नावाच्या छोट्या खेड्यातही जाते.
या कादंबरीचं मी लेखन केलयं ते आवडणाऱ्या – नावडणाऱ्या ‘ बदलां’ ना रंजकतेने दाखविण्यासाठी, जमल्यास तुम्हाला अस्वस्थ करण्यासाठी आणि अर्थातच युवकांची वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी!
डॉ. गिरीश जाखोटिया
Reviews
There are no reviews yet.