मनुस्मृती देशाला लागलेला कलंक

90.00

98 in stock

पुस्तकाचे नाव मनुस्मृती देशाला लागलेला कलंक
लेखक रामस्वरूप वर्मा
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ११० ग्रॅम

Description

तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर, संत तुकाराम महाराज, क्रांतिसूर्य  महात्मा जोतीबा फुले, राजर्षी  शाहू महाराज या महामानवांना आपले गुरू मानणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. कारण यातील विभक्त 12 प्रकरणांमध्ये शूद्रातिशूद्रांचे उपमर्द करणारे, त्यांची प्रगती खुंटवणारे, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे षडयंत्रकारी विचार मांडले आहेत. एवढेच नाही तर शूद्र, इतर बहुजन आणि स्त्रियांना अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून कायमस्वरूपी गुलाम बनविण्याची व्यवस्थाच या ग्रंथात  केली गेली आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह याचे सार्वजनिक दहन करुन नवमानवतेच्या क्रांतीचे रणशिंग फुंकले. या ग्रंथांमध्ये जातिव्यवस्था बळकट करून शोषणाला खतपाणी  घालण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला गेला आहे. शुद्रातिशूद्र, बहुजन समाज आणि स्त्रियांना हीनतेची वागणूक देऊन केवळ ब्राह्मणच श्रेष्ठ आहे. हे समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणूनच हा ग्रंथ देशाला आणि एकूणच मानवतेला लागलेला एक कलंकच आहे. श्री. रामस्वरूप वर्मा यांनी ”मनुस्मृती : राष्ट्र का कलंक” या हिंदी पुस्तकात काही निवडक आणि ठळक मुद्द्यांना हाट घालून मनुस्मृती ग्रंथाची चिरफाड करताना हा ग्रंथ मानवी हिताच्या विरोधात कसा आहे, याचे सोदाहरण विश्लेषण केले आहे. यामध्ये त्यांनी मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांचा महिमा, शूद्रांचे स्थान, स्त्रियांचे स्थान , मनुस्मृतीतील जातिव्यवस्था, अंधश्रद्धा आणि भारतीय राज्यघटनेला हा ग्रंथ कसा मारक आहे, हे स्पष्ट केले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनुस्मृती देशाला लागलेला कलंक”

Your email address will not be published. Required fields are marked *