शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट

315.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट
लेखक हेमंतराजे गायकवाड़
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३१७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३७४ ग्रॅम

Description

”शिवाजी महाराज ही व्यक्ती जर एखाद्या यूरोपियन देशात जन्मास आली असती तर महाराजांच्या स्तुतीचे स्तंभ गगनाला भिडले असते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा जयजयकार झाला असता. अंधारात बुडालेल्या जगाला त्यांनी प्रकाशित केले, असेही म्हटले गेले असते.”

श्रीमती इंदिराजी गांधी (लोकराज्य 1985)

” प्रस्तुत पुस्तकात महाराजांच्या चरित्राचे सर्वकष प्रस्तुतीकरण केले आहे. त्यात विश्व इतिहासातील अन्य राजयोद्धाच्या व्यक्तिमत्त्वाची तुलनात्मक अध्ययन अत्यंत पठनीय आहे. महाराजांच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिली गेली पण अन्य जागतिक ऐतिहासिक व्यक्तीमत्वांच्या  जीवनाशी तुलनात्मक अध्ययन प्रकाशित करून डॉ. हेमंत यांनी एक नवा उपक्रम आरंभ केला आहे.”

श्री. पी. के. बी. चक्रवर्ती –

आय. पी. एस. पूर्व महासंचालक  व महानिदेशक  – होमगार्ड / नागरी  संरक्षण व उपमुख्यमंत्री (गृहमंत्री) यांचे विशेष सल्लागार, (महाराष्ट्र राज्य)

” आराध्य देवताचे गुण आरतीत गातात, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आपण त्यांना आदर प्रेमामुळे देतो की निखळ कर्तृत्वामुळे? भक्तीभाव दूर सारून, मापदंड वापरून हे कार्य डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी मनस्वीपणे केले आहे. शौर्याच्या मिथकमूर्तीपासून ते वैश्विक स्तरावरील महान योद्धे व सम्राट यांच्याशी एका तात्विक बैठकीवर तुलना करण्याची ही अनोखी वाटचाल आहे. वस्तुनिष्ठ कसोट्यांवर पारखून पाहता तुमचा आमचा ‘शिवबा’ हे केवळ शंभर नंबरी सोनं नाही, तर जगाच्या इतिहासाच्या दालनात लखलखणारा चौसष्ट पैलूंचा स्वयंप्रकाशी हीरा आहे, याची खात्री पटते.” 

-डॉ. श्रीकांत सापटणेकर – एम्. डी. (वैद्यक)  एम्. डी. (सामाजिक वैद्यक), पूर्व संचालक, हाफकीन संस्था, मुंबई

 ” हा ग्रंथ अलेक्झांडर ते नेपोलियांपर्यंत सर्व योद्ध्यांशी शिवाजी महाराजांची तुलना करणारा आणि शिवाजी महाराजांचा अद्वितीय पुरूष म्हणून गौरव करणारा पहिला ग्रंथ आहे”

–  प्राचार्य डॉ. दत्ता पवार  – एम्. ए. (मराठी),  एम्. ए. (हिंदी), पी. एचडी., संचालक : मराठी संशोधन मंडळ, सदस्य : विद्वत परिषद, मुंबई  विद्यापीठ.

” श्री शिवछत्रपती हे मध्ययुगीन इतिहासातील विश्ववंद्य राजे होते. आपल्या सर्वांच्या भाग्याने हे अद्वितीय नररत्न आपल्याच भुमीत जन्माला आले. त्यांचे इतिहासातील वेगळेपण अत्यंत उत्कट शब्दात डॉ. हेमंतराजे गायकवाड़ यांनी प्रस्तुत ग्रंथात मांडले आहे. आपल्या या अद्वितीय राजाचे वेगळेपण समजून घेण्यासाठी हां ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाने वाचलाच पाहिजे.”

प्रा. प्र. के. घाणेकर  – एम्. एस. सी. (वनस्पती शास्त्र), एच. ओ. डी., आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *