अन्न

270.00

Out of stock

पुस्तकाचे नाव अन्न
लेखक अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३११
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३१२ ग्रॅम

Description

अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळं, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य हे अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक जगात सगळीकडेच वापरले जातात. या सगळ्यांचा इतिहास प्रत्यक्ष मानवी उत्क्रांतीपासून, मानवी संस्कृतींच्या उदयापासून ते वैज्ञानिक क्रांती आणि हरित क्रांतीपर्यंत घेऊन जातो. अन्नाभोवती फिरणारा हा माणसाचाच इतिहास थक्क करून सोडणारा आहे.
……

एखादा पदार्थ सुगरणीनं निगुतीन रांधावा, त्याचं सगळं बाळंतपण करावं अशा मायेनं अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हे पुस्तक अक्षरश कुंभाराच्या सुघड भांड्यासारखं बनवलं आहे.

या पुस्तकाची एक खासियत अशी की, हे तुम्ही कुठल्याही प्रकरणापासून वाचू शकता. यात पदार्थ आणि त्यांच्या कृती नाहीत; पण ओघाओघाने एखाद्या पदार्थाचे नाव कळते, तो कुठला हे समजते आणि त्याचबरोबर २० प्रकरणांमधून आपल्याला भटके जीवन, शेती, पशुपालन, दूध, ब्रेड, तेल, तूप, चरबी, मीठ, मसाले, साखर, मद्य, चहा, कॉफी, चॉकलेट, सोडा अशी रुचकर खाद्ययात्रा घडते. यापैकी आपल्याला ज्या विषयात रुची असेल, तो विषय काढून तुम्ही वाचू शकता…

माझ्याकडे हे पुस्तक आल्यावर मी ते सलग वाचून काढले आणि गेल्या दहा हजार वर्षाचा मानवी अन्नाचा इतिहास वाचून खूपच प्रभावित झालो. या पुस्तकाचा आवाका प्रचंड मोठा आहे. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांच्याकडे विपुल ज्ञानभांडार आहे. शब्दसंपत्तीच्या बाबतीत तर ते कुबेर आहेत. आणि मी सुदामा. सुदाम्याचे हे पोहे गोड मानून घ्या राजेहो ……

विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ, अन्न आणि पाककलेचे अभ्यासक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अन्न”

Your email address will not be published. Required fields are marked *