Description
- जवाहरलाल नेहरू व आझाद यांनी क्रिप्सच्या पुढे ३० मार्चला काँग्रेसतर्फे योजना मांडली.
- ब्रिटनने भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची घोषणा ताबडतोब करावी.
- भारतात आपली राज्यघटना तयार करण्यासाठी घटना परिषद भरविण्याचा हक्क मान्य केला पाहिजे.
- ही परिषद सार्वत्रिक मतदानाच्या आधाराने निवडण्यात यावी आणि
- भारतीय केंद्र सरकार ताबडतोब निर्माण करण्याचे जाहीर करावे. ही योजना ब्रिटनने स्वीकारली तर भारत ब्रिटनला युद्ध जिंकण्यास मदत करील. क्रिप्सनी उलट अशी योजना नेहरू व आझाद यांच्यापुढे मांडली की, (१) ब्रिटन भारताला युद्धसमाप्तीनंतर वसाहतीचे स्वराज्य देईल. (२) भारताने, घटना समिती १९३५ च्या कायद्यातील मतदानाच्या आधारे निवडावी आणि (३) राज्यघटना युद्धसमाप्तीनंतर तयार करावी. नेहरू- आझादांनी क्रिप्सची योजना नाकारली. ३० मार्चला रात्री क्रिप्सनी रेडिओवरून भाषण करून आपल्या योजना, भारताने अजून विचार करून स्वीकाराव्या, अशी भारतीयांना विनंती केली.
Reviews
There are no reviews yet.