Description
मनुष्येतर जीव व मनुष्य ह्यात निसर्गतः अत्यंत अंतर आहे. मनुष्य इहपर विचार करू शकतो; मनुष्येत्तर जिवांना अर्थात तत्वज्ञानाची गरज पडत नाही, ह्याशिवाय मनुष्येतर जिवांचे • भागू शकते. माणसाला मनुष्येतर जिवापेक्षा खूपच जास्ती बुद्धी निसर्गतः प्राप्त झाली आहे व मनुष्य त्याच्या बुद्धीचा व ज्ञानाचा सतत विकास करू शकतो. मनुष्याच्या भोवती जे विश्व आहे. सृष्टी आहे व भौतिक आणि विज्ञानात्मक जड पदार्थ आहेत त्यांचा तो शोध करू शकतो. भूत, वर्तमान व भविष्यकाळाचाही तो विचार करू शकतो. युक्तीपूर्वक बुद्धी योजून, तो विविध तत्वज्ञानाचा विचारप्रपंच करू शकतो. असा प्रयत्न तो करीत आल्यामुळे तत्वज्ञानाच्या विस्तारक्षम क्षेत्रात अनेक दर्शने निर्माण होत आली आहेत. मनुष्याची बुद्धी ही भेदाभेदात्मक विवेक करू शकते, बुद्धिभेद करू शकते, परस्पर खंडन, समर्थन, समन्वय वगैरे प्रकारे मनुष्य बुद्धी चालवू शकतो. मनुष्य म्हणजे बुद्धी, या बुद्धीने मनुष्य सारासार विचार, सद्-असद् विवेक करू शकतो. बुद्धीने चालू शकतो, वर्तृ शकतो. साहजिकच मनुष्याच्या या धर्माला (स्वभावाला) ‘बुद्धधर्म’ हे नाव प्राप्त होणे, अटळ होते. हा स्वाभाविक धर्म होय. नैसर्गिक धर्म होय. ह्यात फॉरेन काही नाही. जे आहे ते सर्व नीतिप्रधान आहे, कर्मकांडप्रधान नाही.
Reviews
There are no reviews yet.