Description
बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे, उपदेशांचे वर्णन करणाऱ्या अनेक बोधकथा प्रसिद्ध आहेत. पण यापैकी बऱ्याच गोष्टी विविध चमत्कारांनी भरलेल्या आहेत. वैज्ञानिक कसोट्यांवर न टिकणारे, निसर्ग नियमांच्या विरोधात जाणारे कुठलेही चमत्कार बुद्धांना मान्य नव्हते. मानवी जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी आपल्या वागणुकीतील बदल महत्त्वाचा आहे, अशी त्यांची शिकवण होती. आपल्या आजच्या पिढीला बालवयात बुद्धविचारांची ओळख झाली, तर त्यांचे जीवन नक्कीच प्रकाशमान होईल. बुद्धांचे विचार बालमनावर कोरण्यात माझ्या या संपादनाचा थोडा जरी उपयोग झाला, तरी मला अपार आनंद होईल.
Reviews
There are no reviews yet.