Description
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पर्दापण करत आहोत. ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक इतिहासलेखनाचा एक भाग म्हणून आपल्या तालुक्याचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय योगदान होते, याची चर्चा करणे आवश्यक आहे. सातवाहन काळापासून आर्थिक राजधानी, छत्रपती शिवरायांची जन्मभूमी, मोगल काळात हापूस आंबा लागवडीचे महत्त्वपूर्ण केंद्र तसेच शिवनेरी, हडसर, चावंड, नारायणगड, जीवधन, निमगिरी, सिंदोळा या सात किल्ल्यांसाठी जुन्नर प्रसिद्ध आहे. निसर्गाने नटलेली व सुजलाम् सुफलाम् असलेली भूमी… आशिया खंडातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीणसुद्धा याच तालुक्यात आहे.
स्वातंत्र्य चळवळीतही जुन्नर तालुका मागे नव्हता. तालुक्यातील ३३ स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्या सर्वांची मुद्देसूद माहिती, मिठाचा व जंगल सत्याग्रह, खादीची चळवळ, भूमिगत क्रांतिकारकांचे कार्य… घटकांचा आढावा या पुस्तिकेत घेण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.