Description
प्रस्तुत पुस्तिका के. राघवेन्द्र राव ह्यांनी मूळ इंग्रजीतून लिहिलेल्या विनिबंधाचा अनुवाद आहे. या विनिबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सव्यसाची व्यक्तिमत्वाबरोबरच त्यांनी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मशास्र आणि एकूणच मानवी जीवनाच्या अनुषंगाने अतिशय ओघवत्या शैलीत मांडलेले अभ्यासपूर्ण आणि शास्रशुद्ध सिद्धांत, विचार यांचे प्रभावी दर्शन होते.
के. राघवेन्द्र राव ह्यांनी टोरॅटो विद्यापीठात आपले पीएच.डी. पूर्ण केले. बंगलोर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात त्यांनी यु.जी.सी.चे इमिरिट्स फेलो म्हणून केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. या पुस्तिकेच्या अनुवादक मुक्ता जगन्नाथ महाजन ह्या जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख असून त्यांनी अनेक भाषांतरे केलेली आहेत.
Reviews
There are no reviews yet.