Description
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व व विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरविणारा राजा. समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण अशा सर्वच मानवतावादी – लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता राजा. शिव म्हणजे सत्य. शिव म्हणजे सुंदर. शिव म्हणजे सर्वोत्तम. शिव म्हणजे लोक. शिव म्हणजे प्रेम. शिव म्हणजे मात्तृत्व. शिव म्हणजे पितृत्व. शिव म्हणजे कर्तृत्व. शिव म्हणजे कर्तव्य. शिव म्हणजे पाखंड खंडन. शिव म्हणजे कंटकांचे निर्दालन. शिव म्हणजे अधमाशी अधम. शिव म्हणजे स्वराज्य. शिव म्हणजे शिवराज्य ! शिव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी शिवराज्य ! जे कां रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि मराठा जाणावा, शिवराय तेथेचि मानावा ।। एवढे स्पष्ट मानवतावादी मराठा तत्वज्ञान आचरणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. निराधारांचा आधार म्हणजे शिवराय. शोषितांचा आधार म्हणजे शिवराय. शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय. कष्टकऱ्यांच्या आधार म्हणजे शिवराय. श्रमकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय. अबलांचा आधार म्हणजे शिवराय. तरुणांची प्रेरणा म्हणजे शिवराय. वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय. वीरांची प्रेरणा म्हणजे शिवराय. शूरांची प्रेरणा म्हणजे शिवराय. कलाकारांची प्रेरणा म्हणजे शिवराय. विश्वकल्याण म्हणजेच शिवराय. विश्वबंधुत्व म्हणजेच शिवराय. लोककल्याण म्हणजेच शिवराय. शून्य म्हणजेही शिवराय. नि अनंत म्हणजेही शिवराय !!
Reviews
There are no reviews yet.