Description
परशुराम आमच्या वाटेला आला नसता, तर आम्हीही त्याला आडवे झालो नसतो. पण इतिहास तसा नाही. सध्याचे वास्तव हि तसे नाही. पशुराम पूर्वजांनी नाकारला होता आणि नव्या पिढीनेही नाकारलाच पाहिजे; नव्हे, तिला तो नाकारावाच लागेल. कारण, समग्र समाज हा एखाद्या व्यक्तीपेक्षा वा गटापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि अधिक रक्षणीय असतो. परशुराम मात्र समाजाच्या रक्षणाचे वा ऐक्याचे साधन नाही, तर दुहीचे कारण आहे. तो समाजाला जोडण्याचे माध्यम नाही. तर त्याला तोडण्याचे प्रतीक आहे. त्याची कुऱ्हाड निरागस पाखरांचे घरटे विस्कटून टाकणारी आहे आणि आम्हांला तर पाखरांना चारा भरविणारे वात्सल्य हवे आहे !
Reviews
There are no reviews yet.