विदुषी : दुर्गा भागवत

72.00

1 in stock

पुस्तकाचे नाव विदुषी : दुर्गा भागवत
लेखक माधव जोशी
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

गेल्या ५०-६० वर्षांतील विशेषकरून १९४० ते १९८०-९० पर्यंतच्या काळातील निवडक साहित्यिकांचा परिचय करून देणारी ही पुस्तकमालिका. ह्या साहित्यिकांची ओळख करून देताना त्यावेळचा आपला मराठी समाज, १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ, स्वातंत्र्यलढा,  १९४७ चे भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आशा ऐतिहासिक ठळक घटना आपल्यासमोर ओघाने येतात. तसेच मराठी साहित्यातील नवे प्रवाह; नवकविता, नवकथा, वैचारिक वाङ्मय, विनोदप्रधान साहित्य, वंचितांची अभिव्यक्ती असलेले साहित्य असे विविध प्रवाहदेखील आपल्याला ह्या पुस्तकांतून दिसतात.

परिचयात्मक अशी ही पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्याची समीक्षा नाही किंवा केवळ त्या साहित्यिकांचे चरित्र नाही. त्यांच्या साहित्याचा हा परिचय आहे. तसेच ह्या लेखकांनी लिहिलेले साहित्याही संक्षिप्तपणे ओळख होण्यासाठी यामध्ये समाविष्ट केले आहे.

दुर्गाबाईंची लेखनशैली, भाषा, शब्द प्रतिमा, नादप्रतिमा हे सगळ्यांच्या मनाचा ठाव घेते. मराठी संशोधन विषयात ‘लोकसाहित्य’ हा विषय रुजवण्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांनी खुली केली. त्या सर्व संस्कृतीला प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विदुषी : दुर्गा भागवत”

Your email address will not be published. Required fields are marked *