Description
गेल्या ५०-६० वर्षांतील विशेषकरून १९४० ते १९८०-९० पर्यंतच्या काळातील निवडक साहित्यिकांचा परिचय करून देणारी ही पुस्तकमालिका. ह्या साहित्यिकांची ओळख करून देताना त्यावेळचा आपला मराठी समाज, १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ, स्वातंत्र्यलढा, १९४७ चे भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आशा ऐतिहासिक ठळक घटना आपल्यासमोर ओघाने येतात. तसेच मराठी साहित्यातील नवे प्रवाह; नवकविता, नवकथा, वैचारिक वाङ्मय, विनोदप्रधान साहित्य, वंचितांची अभिव्यक्ती असलेले साहित्य असे विविध प्रवाहदेखील आपल्याला ह्या पुस्तकांतून दिसतात.
परिचयात्मक अशी ही पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्याची समीक्षा नाही किंवा केवळ त्या साहित्यिकांचे चरित्र नाही. त्यांच्या साहित्याचा हा परिचय आहे. तसेच ह्या लेखकांनी लिहिलेले साहित्याही संक्षिप्तपणे ओळख होण्यासाठी यामध्ये समाविष्ट केले आहे.
ग्रेस यांच्या कविता आणि गद्यलेखन कितीही वाचले, कितीही वेला वाचले तरी संपूर्ण अर्थबोध होतोच असं नाही. एकसंघ अनुभवविश्वातून आपण जातोच असे नाही. ते गूढ उकलतच नाही. पारा हा जसा हातात धरता येत नाही, तसेच त्यांचे साहित्य आपल्या हातात समग्रतेने येत नाही. त्यातील गूढ संपत नाही…

Reviews
There are no reviews yet.