Description
पाली त्रिपिटक वाङ्मय भगवान बुद्धाची जगाला महान देणं आहे. वैश्विक मानवतेच लेण आहे. कुशल कर्म आहे. बुद्धशासन म्हणजे बुद्धधर्म आहे. चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाणाचे दर्शन – दिग्दर्शन आहे. आर्य अष्टांगिक मार्गच तत्त्वज्ञान ह्याचा विषय आहे. उत्तम मंगल व सर्वोत्तम मानवता ह्याचा आशय आहे. त्रिपिटक वाङ्मय वैश्विक बौद्धांची आस्था आहे. दु:खमुक्तीचा रास्ता आहे. हयात सम्यक सम्बुद्ध शास्ता आहे. जम्बूद्वीपाचा अथवा भारताचा भाग्यविधाता आहे. ह्याच वाङ्मयाचा जगातील सकल वाङ्मयावर प्रभाव आहे. कारण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हाच बुद्धधम्माचा स्वभाव आहे.

Reviews
There are no reviews yet.