Description
पृथ्वीवर प्रचंड विस्तार असलेले महासागर आहेत. हिमाच्छादित शिखरे असणारी पर्वत आहेत. हिरवीगार जंगले, कुरणे – शेतमळे आहेत. पण अचानक एखाद्या जागी जमिनीतून, कधी उंच पर्वतावरून, तर कधी एखाद्या टेकाडावरून आगीचा लोळ उठतो. तेव्हा आग, धूळ आणि धूर मोठा आवाज करत त्या उद्रेकातून बाहेर पडतात. काही काळ ही आतिषबाजी सुरू राहते, मग तप्त शिलारासाचे, ल्हावाचे ओढ़े वरुन खाली वाहत येतात. जे काही वाटेत येईल त्याची राख करत त्याला गाडून टाकत हा लाव्हा पुढे जात राहतो. लाव्हा थंड होऊन त्याचे दगडी आवरण आसपासच्या प्रदेशावर पडल्यावरच हा प्रकार थांबतो. हे सारे नुसते भीतिदायक नाही, तर हे उद्रेक तिथे आणि आसपास असणाऱ्या सगळ्या ‘आहे चे नाही’ करून टाकतात.
ही एवढी आग डोंगराच्या आतून बाहेर येतेच कशी? ती आधी असते कुठे ? ती का बाहेर येते ? हे प्रश्न पडणे साहजिकच आहे. काही ठिकाणी यासाठी उत्खनन ही केले गेले आहे. आजही असे ज्वालामुखीचे उद्रेक काही ठराविक ठिकाणी होताना दिसतात. काय वेगळे आहे त्या जागांमध्ये ? हे उद्रेक कधी होताता ते सांगता येईल का ?
अशा प्रश्नांची समर्पक वैज्ञानिक उत्तरे असणारे, ज्वालामुखींच्या शोधांबद्दलची सचित्र माहिती देणारे हे पुस्तक. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही उपयुक्त ठरेल. आपल्या विज्ञान विषयाच्या ग्रंथ संग्रहात कायमची मोलाची भर घालणारे ठरेल. . .

Reviews
There are no reviews yet.