Description
”मुलांसाठी मेडिकल जनरल” नॉलेज या पुस्तकाची संकल्पना मुळात फार सुंदर आहे. अशा प्रकारची आरोग्यविषयक माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याने त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल. पुस्तकातील भाषा अतिशय सुलभ असल्याने सर्वसामान्य माणसाचे वैद्यकशास्त्राबाबत असणारे अनेक समज – गैरसमज या पुस्तकाचा साहाय्याने निश्चितच दूर होतील. वैद्यकीय शिक्षणक्षेत्राची संबंधित नसणाऱ्या व्यक्तींना काही आजारांची नावेच फ़क्त माहीत असतात. त्या आजारांमागील कारणे आणि लक्षणे यांबद्दल त्यांना कोणतीही कल्पना नसते. पल्स पोलियो म्हणजे काय ? किंवा मार लागल्यास डोक्याला टेंगूळ का येते ? यांसारखे प्रश्न अनेकांच्या मनात असतात; परंतु त्यांच्या शंकांचे निरसन होत नाही. या पुस्तकाच्या साहाय्याने सामान्य लोकांच्या मनातील शंकांचे निश्चितच समाधान होईल यात शंका नाही. ही पुस्तके वाचून लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच; पण ह्या पुस्तकांमुळे त्यांची आकलन शक्ती प्रगल्भ होऊन त्यांच्या मनात आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील आणि असे वाटते की, त्यातूनच उद्याचे शास्त्रज्ञ तयार होतील.

Reviews
There are no reviews yet.